Sanshodhan Padhati Phd Pravesh Pariksha Va Net SetPet Pariksha Margadarsaka
K सागरीय.
मानवी जीवनाची विविध क्षेत्रामध्ये जी प्रगती झाली आहे, त्याचा मूलाधार संशोधन हा आहे. संशोधनातून मानवी जीवन सुकर व समृद्ध झाले आहे. मानवासमोर येणाऱ्या विविध आव्हानांना तोंड देण्याचे सामर्थ्य संशोधनातून येत असते. संशोधनासाठी तीव्र जिज्ञासा, चिकाटी, परिश्रम व सतत नवे शोधण्याचा ध्यास आवश्यक असतो. संशोधने ही केवळ पदवीसाठी न करता ती वैज्ञानिक प्रगतीसाठी, राष्ट्राच्या उन्नतीसाठी करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संशोधनाचा दर्जा उंचावणे आवश्यक आहे.
विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) भारतातील विविध विद्यापीठातील संशोधनाचा दर्जा उंचावण्या- साठी प्रयत्नशील आहे. त्यादृष्टीने यूजीसीने २०१६ मध्ये पीएच्.डी. व एम्. फिल. प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा सुरू केली आहे. या प्रवेशपरीक्षेत पेपर एक अनिवार्य असून तो संशोधन पद्धती व पेपर दोन हा पदव्युत्तर पदवीशी संबंधित असतो. या दोन्ही पेपर- एकत्रित गुणांवर पीएच्. डी. व एम्. फिल्. पदवीसाठी प्रवेश दिला जातो. यूजीसीच्या या नियमानुसार महाराष्ट्रातील सर्वच विद्यापीठात पीएच्. डी. प्रवेश परीक्षेचे आयोजन केले जाते. त्यानुसार अलीकडेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ-सोलापूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ- जळगाव, शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ-पुणे यांच्या पीएच्.डी. प्रवेश परीक्षेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उच्च शिणातील पीएच्. डी. पदवीचे महत्त्व व प्राध्यापक बनण्यासाठी आवश्यक अर्हता यामुळे या पदवीला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमधील स्पर्धा वाढत आहे.
त्यादृष्टीने विद्यार्थ्यांना पीएच्.डी. प्रवेश परीक्षेत यश मिळविण्याचा प्रवास सुकर करण्यासाठी के’सागर प्रकाशनकडून डॉ. शशिकांत अन्नदाते यांचा ‘संशोधन पद्धती’ हा दर्जेदार संदर्भ प्रकाशित केला जात आहे.
डॉ. शशिकांत अन्नदाते यांनी प्रस्तुतच्या संदर्भात संशोधन पद्धतीचे विस्तृत, परीक्षाभिमुख विवेचन केले असून परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे ५०० + वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह दिलेले आहेत. प्रस्तुतचा संदर्भ हा पीएच्. डी. व एम्. फिल्. प्रवेश परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त ठरणार आहे. विशेष म्हणजे यूजीसीने अलीकडेच नेट-सेट परीक्षांचा अभ्यास-क्रम बदलला आहे, या परीक्षेतील पेपर एक मधील ‘संशोधन अभियोग्यता घटकासाठी प्रस्तुतचा संदर्भ अतिशय उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे एम्. एड्., एम्. एस्. डब्ल्यू., एम्. ए. या पदव्युत्तर परीक्षांमधील संशोधन पद्धती या पेपरसाठी प्रस्तुत पुस्तक विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणार आहे.
प्रस्तुतच्या संदर्भाचे लेखन करण्यासाठी श्री. आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन व ज्येष्ठ विधिज्ज्ञ मा. के. ए. कापसे साहेब, संस्थेचे सचिव मा. महावीर देसाई, प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, पीएच्. डी. संशोधन मार्गदर्शिका डॉ. पद्मा जाधव यांनी मार्गदर्शन केल्याचे लेखक नमूद करतात. संशोधन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएच. डी. प्रवेश परीक्षेत यश मिळविण्यासाठी व संशोधनात अभिरुची निर्माण करण्यासाठी प्रस्तुतचा संदर्भ निश्चितच यशस्वी ठरेल असा विश्वास वाटतो. यशोदायी शुभेच्छांसह!
आपलाच व्ही. एस. क्षीरसागर (के’सागर)
Reviews
There are no reviews yet.