K’Sagar Sampurna Police Bharti Pariksha संपूर्ण पोलीस भरती परीक्षा
Sampurna Police Constable Bharti Pariksha संपूर्ण पोलीस हवालदार भरती परीक्षा
महाराष्ट्र राज्यातील महानगरांतील पोलीस आयुक्तालये, लोहमार्ग पोलीस आयुक्तालय व जिल्हा पोलीस कार्यालयांकडून अलीकडील काळात मोठ्या प्रमाणावर व बऱ्याचशा प्रमाणात सातत्याने महिला व पुरुष पोलीस कॉन्स्टेबल्सची भरती केली जात आहे.
पोलीस शिपाई पदाला असलेला सामाजिक दर्जा, नोकरीची शाश्वती व पदोन्नतीच्या संधी यांमुळे किमान उच्च माध्यमिक परीक्षा (इयत्ता बारावी) इतकीच शैक्षणिक पात्रता आवश्यक असलेल्या पोलीस भरती परीक्षेस पदवीधर, द्विपदवीधर व पदव्युत्तर पदवीधारकही मोठ्या प्रमाणावर बसत आहेत. साहजिकच, या परीक्षेतील स्पर्धा दिवसेंदिवस वाढतच आहे. या वाढत्या स्पर्धेचा आणि आपल्या लेखी परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा विचार करून
(१) पोलीस भरती परीक्षेची तयारी (२) मराठी व्याकरण (३) बुद्धिमापन (४) अंकगणित (५) सामान्यज्ञान (६) आदर्श प्रश्नपत्रिका (७) पूर्वीच्या प्रश्नपत्रिका व (८) चालू घडामोडी -अशा आठ विभागांत या पुस्तकाची रचना साकारली आहे.
लेखी परीक्षेचा एकूण अभ्यासक्रम पाहता एकाच पुस्तकात संपूर्ण अभ्यासक्रमाचा परामर्श घेणे खरे तर, कठीण काम! परंतु ‘महत्त्वाचे ते सर्व काही व अनावश्यक ते अजिबात नाही!’ हे तंत्र वापरून संपूर्ण अभ्यासक्रमाचा यथायोग्य परामर्श या एकाच पुस्तकात घेण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर पोलीस भरती परीक्षेत यश मिळविण्यासाठी विद्यार्थिमित्रांना हे पुस्तक निर्विवादरीत्या उपयुक्त ठरेल, असा यथार्थ विश्वास वाटतो. तथापि, या अटीतटीच्या स्पर्धेत इतरांना मागे टाकून पुढे जावयाचे असल्याने माझ्या विद्यार्थिमित्रांनी या पुस्तकासह के सागर लिखित संपूर्ण मराठी, संपूर्ण बुद्धिमापन, जनरल नॉलेज ५,५०० वस्तुनिष्ठ प्रश्न उत्तरांसह, लेटेस्ट जनरल नॉलेज, संपूर्ण जनरल स्टडीज, ऑल इन वन सामान्यज्ञान, संपूर्ण अंकगणित, परिपूर्ण अंकगणित, समग्र सामान्यज्ञान, पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षा चाळीस प्रश्नपत्रिका (विनायक घायाळ), पोलीस कॉन्स्टेबल २०२२-२३ : विश्लेषण व स्पष्टीकरणांसह २५ प्रश्नपत्रिका (विनायक घायाळ) आदी पुस्तके अभ्यासणे आवश्यक आहे, असा अगत्याचा सल्ला त्यांना देणे मी माझे कर्तव्य मानतो.
आपल्या खात्रीदायक यशाकरिता अगत्याच्या शुभेच्छांसह!!
- Police bharti books
- police thokla
- police guide
- best police book
- Police bharti books marathi
- 25000+ question bank
- police pyq
- Police bharti thokla
- Police bharti classes
Reviews
There are no reviews yet.