Gramsevak Tantrik Dnyan Sampurna Margadarshak TCS IBPS Special संपूर्ण ग्रामसेवक
TCS IBPS Special
संपूर्ण ग्रामसेवक 27 वी आवृत्ती
तांत्रिक अभ्यासक्रम व सामान्य ज्ञान के सागर
2023 च्या सुधारित व विस्तारित अभ्यासक्रमानुसार
के’सागरीय
या वर्षी राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये मोठ्या प्रमाणावर विविध पदांची भरती होत आहे. ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला) ही यांतील अत्यंत महत्त्वाची पदे. या सर्व पदांसाठी मराठी, इंग्रजी, अंकगणित- बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान हे चार घटक समाविष्ट असलेला अभ्यासक्रम १२० गुणांसाठी, तर तांत्रिक ज्ञान या एकाच घटकाचा अभ्यासक्रम ८० गुणांसाठी विहित केलेला आहे. यावरून या परीक्षेतील तांत्रिकज्ञान या विषयाचे महत्त्व स्पष्ट व्हावे.
प्रस्तुतचे पुस्तक हे कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या तांत्रिकज्ञानाच्या अभ्यासक्रमानुसार आहे. हा अभ्यासक्रम अतिशय विस्तृत व व्यापक असून या अभ्यासक्रमास न्याय देणारे एकही पुस्तक आज उपलब्ध नाही, हे लक्षात घेऊन अस्मादिकांनी आपल्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ लेखनानुभवातून या पुस्तकाची रचना साकारली असून नेहमीपेक्षा वेगळ्या असलेल्या या व्यापक व सखोल अभ्यासक्रमास न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामसेवक पदासाठी विहित केलेल्या तांत्रिकज्ञानाच्या या अभ्यासक्रमावर केवळ नजर टाकली तरी त्याचे नावीन्य, व्यापकत्व व सखोलता ध्यानी यावी.
काही प्रकरणांत केवळ चर्चा, काही प्रकरणांत केवळ महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न, तर काही प्रकरणांत दोहोंचा समावेश करून सुलभरीत्या अभ्यासक्रमाचा परिपूर्ण परामर्श घेण्याचा प्रयत्न केला आहे.
पुस्तकावर घ्याव्या लागलेल्या परिश्रमामुळे व पुस्तकाची रचना करण्यास तीन-चार महिन्यांचा कालावधी (लेखकासह सात-आठ जणांच्या टीमला ) लागल्याने प्रस्तुतचे पुस्तक प्रकाशित होण्यास काहीसा विलंब लागला आहे. त्याबद्दल खंत वाटत असली तरी हा सर्व कालावधी पुस्तकाची उपयुक्तता व अचूकता वाढविण्यासाठी उपयुक्त ठरला, याचा आनंद मोठा आहे.
हार्दिक शुभेच्छांसह!
आपला, व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
Reviews
There are no reviews yet.