You must have an order with a minimum of 1 pcs to place your order, your current order total is 0 pcs.
Samgra Manvi Hakka समग्र मानवी हक्क
Samgra Manvi Hakka समग्र मानवी हक्क Original price was: ₹425.00.Current price is: ₹318.75.
Back to products
Kalashakha Ghatak कलाशाखा घटक
All in One Samanyadnyan GK Original price was: ₹395.00.Current price is: ₹296.25.

Samagra Vidnyan Tantradnyan समग्र विज्ञान तंत्रज्ञान

Original price was: ₹355.00.Current price is: ₹266.25.

81 in stock

Description

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या चौथ्या पेपरमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती या घटकाच्या अभ्यासक्रमानुसार

समग्र विज्ञान तंत्रज्ञान

सुधारित व विस्तारित ८ वी आवृत्ती

डॉ. प्रमोद जोगळेकर

केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेकरिताही अत्यंत उपयुक्त

प्रस्तावना…..

आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे, असे आपण म्हणतो. याचे कारण म्हणजे आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवनाच्या सर्व पैलूंवर विलक्षण परिणाम झाला आहे. विशेषतः तंत्रज्ञानामधील प्रगतीचा झपाटा तर एवढा मोठा आहे की, आपल्या डोळ्यांदेखत काल अशक्य, अतर्क्स अथवा स्वैर कल्पना वाटलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आलेल्या दिसतात. ऊर्जाक्षेत्र,संगणक व माहिती तंत्रज्ञान,दळणवळण,अवकाश तंत्रज्ञान,संरक्षण,आपत्ती निवारण,हवामान व पर्यावरण,अन्न उत्पादन,कृषी,पशुसंवर्धन,पशुआरोग्य,मानवी आरोग्य आणि एकूणच मानवाचे जीवनमान उंचावण्याच्या बाबतीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाला पर्याय नाही.

आपल्या जीवनात अनन्यसाधारण स्थान असलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगतीची माहिती सर्वांनाच असणे आवश्यक आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षेत यशस्वी होऊन प्रशासनाच्या माध्यमातून समाजासाठी काहीतरी योगदान करावे अशी इच्छा बाळगणाऱ्या युवक-युवतींनी विज्ञान आणि तंत्रज्ञानामधील मूलभूत संकल्पना समजून घेणे नितांत गरजेचे आहे. आधुनिक भारताच्या जडणघडणीत विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा वाटा मोठा आहे, हे निर्विवाद आहे.

प्रस्तुतचे पुस्तक राज्यसेवा मुख्य परीक्षेतील विज्ञान-तंत्रज्ञान या दरम्याच्या अभ्यासक्रमानुसार रचना केली असून इतरही स्पर्धा परीक्षांना ते उपयुक्त ठरेल, अशा प्रकारे त्याची सर्व समावेशक रचना साकारली आहे. साधी-सोपी के’सागरीय भाषाशैली जाणीवपूर्वक जपतानाच अद्ययावतता,परीक्षाभिमुखता व उपयुक्तता ही के सागरीय वैशिष्ट्येही जपली आहेत.

सन २०२१ मध्ये प्रस्तुत विषयाच्या आयोगाच्या अभ्यासक्रमात काही मूलभूत बदल केले गेले. खरे तर, हा अभ्यासक्रम अधिक व्यापक व अधिक सखोल बनविण्यात आला. या नव्या अभ्यासक्रमामुळे पुस्तकाची संपूर्ण पुनर्रचना करून ब्लॅकचेन तंत्रज्ञान, समांतर गणन आणि महासंगणक,कृत्रिम बुद्धिमत्ता,मशिन ट्रान्सलेशन,आभासी वास्तव,क्लाऊड संगणन,नॅनो तंत्रज्ञान,भारतातील ऊर्जा संकट,ऊर्जानिर्मिती कार्यक्रम,ऊर्जासुरक्षा,ऊर्जा संशोधन व विकास आदी प्रकरणे-उपप्रकरणे समाविष्ट करून व पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांतील प्रश्न वर्षनिहाय समाविष्ट करून या पुस्तकाची ही आठवी आवृत्ती विद्यार्थी मित्रांच्या हाती देत आहे.

या पुस्तकाच्या संकल्पनेपासून ते या पुस्तकाला प्रस्तुत स्वरूप येईपर्यंतच्या प्रवासात न कंटाळता सर्व तन्हेची मदत, सहकार्य व प्रोत्साहन उत्तेजन देणाऱ्या श्री. व्ही. एस. क्षीरसागर (के’सागर) यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. ते स्वतः स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील मान्यवर लेखक असल्याने आणि अनेक विद्यार्थित्रिय पुस्तकांचे लेखन त्यांच्या खाती जमा असल्याने या पुस्तकाच्या निर्मितीतील त्यांचा सक्रिय सहभाग मी मोलाचा मानतो. या पुस्तकाच्या निर्मितीमध्ये हातभार लावणाऱ्या के सागर पब्लिकेशन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांचाही मी निरतिशय ऋणी आहे.

डॉ. प्रमोद जोगळेकर
पुणे.

⚫ राज्यसेवा मुख्य परीक्षा / Rajya seva Mains

⚫ सामान्य अध्ययन पेपर ४ / G.S.Paper 4

⚫ UPSC सायन्स अँड टेचक्नॉलॉजि / UPSC Science & Technology

⚫ UPSC सायन्स / MPSC सायन्स / UPSC Science / MPSC Science

⚫ के’सागर सायन्स अँड टेचक्नॉलॉजि / K’sagar Science & Technology

⚫ के’सागर संदर्भ / K’sagar Refrance

⚫ केंद्र लोकसेवा आयोग / Kendra Lokseva Ayog

⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book

#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #gspaper4 #mpscscience #upscscience #upscscienceandtechnology #genralscience #gspaper4 #mpscscience #upscscience #upscscienceandtechnology #genralscience #genralstudies

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Download

समग्र विज्ञान तंत्रज्ञान

Download