NCERT Modern India- Adhunik Bharat by Bipin Chandra आधुनिक भारत
NCERT OLD Modern India / Adhunik Bharat /By Bipin Chandra / Marathi Book
आदरणीय डॉ. बिपन चंद्र, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे इतिहास संशोधक. ‘मॉडर्न इंडिया’ हा त्यांच्या व्यासंगी व संशोधनपूर्ण लेखणीतून साकारलेला ग्रंथ. यातील ज्ञानवैभव पाहून नतमस्तक व्हावं! या ग्रंथाचा अभ्यास करताना डॉ. बिपन चंद्रांमधील चिकित्सक इतिहास-संशोधक आणि विश्लेषक- विचारवंत आपणास पानोपानी भेटतो. त्यांच्या व्यासंगी प्रज्ञेच्या परिणत आविष्काराने आपण मोहून जातो. राष्ट्रीय शैक्षणिक अनुसंधान आणि प्रशिक्षण परिषदेने हे पुस्तक अभ्यासक्रमास नेमले आहे; त्यावरून या पुस्तकाचा दर्जा व महत्त्व सिद्ध व्हावे.
प्रस्तुतचा ग्रंथ हा उपरोक्त मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद. महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मायबोलीच्या पदराखाली हे ज्ञानामृत चाखता यावं, ही त्यामागील भावना !
डॉ. बिपन चंद्र यांच्या मूळ इंग्रजी ग्रंथाचं मराठी भाषांतर करणं आणि ते करताना मूळ आशयाला न्याय देणं हे खरं तर, साधारण कार्य नव्हे! डॉ. एम. व्ही. काळे. इतिहासविषयक दहा ग्रंथांचे लेखन आणि अध्यापनाचा दीर्घ अनुभव. त्यांनी ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.
विपन चंद्र सरांनी प्रस्तुतच्या मराठी अनुवादाच्या संपादन संस्करणाची
जबाबदारी आग्रहाने माझ्यावर सोपविलेली. ही जबाबदारी यथामती पण
प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न मी केला आहे.
केंद्र व राज्य लोकसेवा आयोगांचे विद्यार्थी, इतिहास विषयाचे अध्यापक-प्राध्यापक व अभ्यासू-जिज्ञासू अशा सर्वांनाच हा ग्रंथ मार्गदर्शक ठरावा, हीच मनीषा ! मनीची अभिलाषा !
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
Reviews
There are no reviews yet.