MAHA -TAIT Va Kendra Pramukh Bharti Pariksha – Paper Pahila ( Samagra Shikshak Abhiyogita Va Buddhimapan Chachani )
K’ सागरीय…
महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील प्राथमिक शिक्षण सेवक पदांसाठी भरतीपूर्व केंद्रीय निवड परीक्षा पद्धती लागू करण्यात आली आहे.
यापुढे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित व अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची निवड व्हावी, या दृष्टिकोनातून शिक्षण सेवकाची भरती ‘अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी’ यामध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे करण्याचा मार्ग या शासन निर्णयानुसार अनुसरण्यात आल्याचे दिसून येते.
उपरोक्त शासन निर्णयानुसार शासनाने शिक्षण सेवकांच्या निवडीसाठी अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा घेण्याचे निश्चित केले असून अभियोग्यता व बुद्धिमापन या घटकांतर्गत कोणते उपघटक येणार आहेत, तेही विहित केले आहे. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या विद्यमाने ऑनलाइन परीक्षा घेणे नियोजित आहे.
प्रस्तुतच्या लेखकाने स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आपल्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ लेखनानुभवातून प्रस्तुतच्या संदर्भ ग्रंथाची रचना साकारली असून अभ्यासक्रमास यथायोग्य न्याय दिला आहे. गणितीय क्षमता, भाषिक क्षमता (इंग्रजी) व भाषिक क्षमता (मराठी), शिक्षण अभियोग्यता, तार्किक क्षमता आणि बुद्धिमापन चाचणी अशा पाच विभागांत विषयाची चर्चा, महत्त्वाचे मुद्दे व तक्ते आणि भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न अशा स्वरूपात प्रस्तुतचा संदर्भ साकारला गेला आहे. विद्यार्थिमित्रांना विषय मुळातच समजावून देऊन त्यांची परीक्षेस सामोरे जाण्याची उत्तम तयारी होईल, यावर विशेष भर दिला आहे.
प्रकाशनाच्या अन्य अनेक पुस्तकांप्रमाणेच प्रस्तुतचा संदर्भही विद्यार्थिमित्रांना निश्चितच भावेल व त्यांना त्यांच्या परीक्षेत उत्तम यश मिळवून देण्यास उपयुक्त सिद्ध होईल या यथार्थ आत्मविश्वासाने प्रस्तुत संदर्भ आपल्या हाती सोपवित आहे.
आपलाच,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
Reviews
There are no reviews yet.