Prachin Bhartacha Itihas R. N. Gaydhani प्राचीन भारताचा इतिहास
संघ लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोक- सेवा आयोग यांच्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम लक्षात घेऊनच महाविद्यालयीन परीक्षांचा अभ्यासक्रम आखला जावा, हा विचार आज वास्तवाचे रूप ल्याल्याचे महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील पदवी व पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यासक्रम पाहता स्पष्टपणे ध्यानी येते.
या नव्या प्रवाहाचा विचार करूनच पदवी वा पदव्युत्तर परीक्षांमधील इतिहास या विषयाचा अभ्यास करीत असतानाच केंद्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षेतील ‘इतिहास’ या वैकल्पिक विषयांतर्गत ‘प्राचीन भारताचा इतिहास’ या उपविषयाची सखोल तयारी व्हावी, या दृष्टिकोनातून या दोन्ही परीक्षांमधील अभ्यासक्रमाचा एकत्रित विचार करून प्राचीन भारताच्या इतिहासावरील एक परिपूर्ण संदर्भ ग्रंथ साकारला जावा, असा एक विचार मानत रूंजी घालू लागला.
हा विचार वास्तवात येऊन गुरुवर्य प्राचार्य रं. ना. गायधनी सरांच्या व्यासंगातून प्रस्तुतचा ग्रंथ साकारला गेला. आज या ग्रंथपुष्पाची सहावी आवृत्ती मराठी सारस्वताच्या चरणी अर्पण करण्याचा सुयोग आला आहे.
संस्कृत आणि मराठी या दोन्ही भाषांवर तितकेच प्रभुत्व आणि इतिहासाचा गाढा व्यासंग असलेल्या या वयोवृद्ध ज्ञानतपस्व्याने सिद्ध केलेल्या या ग्रंथाची प्रस्तुतची सहावी आवृत्तीही विद्यार्थिमित्रांना भावलेल्या आणि उपयुक्त सिद्ध झालेल्या या पूर्वीच्या दोन्ही आवृत्त्यांप्रमाणेच त्यांचा यशोमार्ग प्रकाशमान करील, यात शंकाच नाही!
ही आवृत्ती आज आपल्या हाती सोपविण्याचे भाग्य मला लाभले आहे. या भाग्याचा आणि या भाग्यशाली क्षणांचा मी ऋणी आहे.
आपला, व्ही. एस. क्षीरसागर
Reviews
There are no reviews yet.