You must have an order with a minimum of 1 pcs to place your order, your current order total is 0 pcs.

Prachin Bharat प्राचीन भारत : एक ऐतिहासिक रूपरेखा (लेखक : प्रा. डी. एन. झा.) (मराठी अनुवाद : प्रा. मा. कृ. पारधी, संस्करण : के’सागर)

Original price was: ₹195.00.Current price is: ₹146.25.

Author         : D.N.Jha K’Sagar के’सागर 

Edition        :  8-2024

Language ‏   :  MARATHI

ISBN             :  9789384730789

Publisher: ‎  : K’sagar Publications 

197 in stock

Description

महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या
क्र.उपुउ/२००५-०६/४००१२/१७/स.पु.दि.२७सप्टेंबर,२००५ अन्वये
‘उत्तम पुस्तक’ म्हणून शिफारस करण्यात आलेला संदर्भ….

Prachin Bharat प्राचीन भारत : एक ऐतिहासिक रूपरेखा (लेखक : प्रा. डी. एन. झा.) (मराठी अनुवाद : प्रा. मा. कृ. पारधी, संस्करण : के’सागर)

 
K’सागरीय

आदरणीय डॉ. डी. एन. झा यांचे ‘Ancient India: In Historical Outline’ हे पुस्तक मराठीत आणण्याची मागणी गेली कित्येक वर्षे माझ्या विद्यार्थी मित्रांकडून केली जात होती. केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेकरिता उपयुक्त सिद्ध झालेल्या या ग्रंथातील ज्ञान मराठी सारस्वताच्या प्रवाहात यावे; हे माझेही स्वप्न होते!
गरज होती ती या ग्रंथास पुरेपूर न्याय देणाऱ्या मराठीतील सिद्धहस्त लेखणीची!

मला गुरुस्थानी असलेल्या आदरणीय माधव कृष्ण पारधी यांच्या रूपाने ही सिद्धहस्त लेखणी गवसली आणि या ग्रंथास आपण आता पुरेपूर न्याय देऊ शकू याची खात्री पटली.सेंट्रल इन्फर्मेशन सर्व्हीसमध्ये पत्रकारितेच्या क्षेत्रात सेवा करून निवृत्त झालेल्या पारधीसरांचे ‘महाराष्ट्र हेरॉल्ड’ या वृत्तपत्रातील ‘Cultural Diary’ हे सदर अनेकांनी वाचले असेल! या सदरात सर जवळ जवळ १८-१९ वर्षे लिहीत होते. एक साक्षेपी समीक्षक म्हणूनही सरांचा लौकिक आहे. त्यांच्या ‘मी परत येईन’ या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्याचे १९८४-८५ मधील उत्कृष्ट लघुकथा संग्रहाचे पारितोषिक मिळाले आहे,हेही येथे नमूद करणे गरजेचे आहे.अशा या व्यासंगी,अनुभवी आणि सिद्धहस्त लेखणीने मूळ ग्रंथास पूर्णतः न्याय दिल्याची प्रचीती आपणास या ग्रंथाच्या पानापानांतून आल्यावाचून राहणार नाही.

गुरुवर्य डॉ. द्विजेंद्रनारायण झा यांनी हा ग्रंथ मराठीत आणण्यास अनुमती दिल्याबद्दल त्यांचा आणि हा ग्रंथ अथक् परिश्रम घेऊन अनुवादित केल्याबद्दल पारधीसरांचा मी निरतिशय ऋणी आहे. या ग्रंथाच्या मराठी भाषांतराच्या संपादन-संस्करणाची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात या दोहोंचे मोठेपण सामावले आहे. गुरुवर्य झा यांचा संक्षिप्त परिचय स्वतंत्रपणे दिला आहे. हा परिचय त्यांच्या व्यासंगी लेखणीची महती स्पष्ट करण्यास पुरेसा ठरावा!

K’सागरीय भाषाशैली,परिपूर्णता तद्वतच उपयुक्तता यांच्याशी इमान राखणारा हा ग्रंथ माझ्या विद्यार्थी मित्रांना निश्चितच भावेल,यात शंकाच नाही.

आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)

#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #ancientindia #acienthistory #ancientindia #mpscupsc #upscbooklist #mpschistory #upschistory #upschistoryoptional #mpsc_history #graduation #graduationstudent

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.