NCERT Medieval India / Madhyayugin Bharat / मध्ययुगीन भारत By Satish Chandra
NCERT OLD Medieval India / Madhyayugin Bharat / मध्ययुगीन भारत By Satish Chandra
आदरणीय प्रा. सतीश चंद्र, इतिहास विषयाचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्षपद व नंतर अध्यक्षपदही भूषविले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासह अलाहाबाद विद्यापीठ, अलिगढ़ मुस्लीम विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ तद्वतच राजस्थान विद्यापीठातही सरांनी इतिहासाचे अध्यापन केले आहे. केंब्रिज विद्यापीठातही त्यांनी अतिथी प्राध्यापक या नात्याने इतिहास विषयावर व्याख्याने दिली आहेत. भारतीय इतिहास काँग्रेसचेही ते प्रथम सचिव व नंतर अध्यक्ष होते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांशी ते संबंधित असून केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पुनर्विलोकन समितीचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.
सर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अन आंतरराष्ट्रीय दर्जाचे इतिहास संशोधक व लेखक आहेत. भारतीय इतिहासाला पूर्वसूरींपेक्षा वेगळे, पण अधिक वास्तव स्वरूप देण्याचे कार्य सरांच्या निष्पक्ष, निर्भीड परंतु तरीही संयमित अशा लेखणीने पार पाडले आहे. ‘मेडिवल इंडिया’ हा त्यांच्या व्यासंगी आणि अभ्यासू लेखणीतून साकारलेला, ओघवत्या इंग्रजीतील विद्यार्थिप्रिय संदर्भ ग्रंथ. वाढत्या विद्वत्तेबरोबर अन् वाढत्या व्यासंगाबरोबर भाषा बोजड व क्लिष्ट बनत नाही; तर ती अधिकाधिक साधी-सोपी व ओघवती बनत जाते, याचे हा ग्रंथ एक उदाहरणच ठरावे. एका दशकाहून अधिक काळ हा ग्रंथ एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमासाठी नेमला गेला होता.
प्रस्तुतचा ग्रंथ हा उपरोल्लिखित मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद, महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मायबोलीच्या पदराखाली हे ज्ञानामृत प्राशन करता यावं, ही हा अनुवाद प्रकाशित करण्यामागील भावना.
कोणत्याही भाषेतील साध्या-सोप्या शब्दांत व ओघवत्या शैलीत केलेले लेखन दुसऱ्या भाषेत अनुवादित करताना दोन्ही भाषांवर अनुवादकाच्या असलेल्या प्रभुत्वाची खरीखुरी कसोटी घेणारंच ठरतं. आदरणीय सर्वश्री मा. कृ. पारधी, डॉ. व. तु. देशपांडे व म. म. मार्डीकर यांनी हे अनुवादकार्य मूळ आशयाला धक्का लागू न देता आणि मूळ ग्रंथातील भाषा-लाघव जपत मोठ्या कुशलतेनं व नजाकतीनं पार पाडलं आहे. त्यांनी केलेला हा अनुवाद महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना नक्कीच रुचेल आणि उपयुक्त सिद्ध होईल, यात मला तरी शंका वाटत नाही.
डॉ. सतीश चंद्र यांचा हा अप्रतिम ग्रंथ मराठीत अनुवादित करण्याचं या तिघांचं हे कार्य म्हणजे शैक्षणिक मराठी सारस्वताच्या प्रवाहास दिलेलं ज्ञानाच होय. इतिहास विषयाचा एक विद्यार्थी या नात्याने त्यांच्या या कार्याबद्दल मी व्यक्तिशः त्यांचा ऋणी आहे. केंद्र व राज्य लोकसेवा आयोगांचे विद्यार्थी, इतिहास विषयाचे अध्यापक-प्राध्यापक,
अभ्यासू-जिज्ञासू अशा सर्वांनाच हा ग्रंथ मार्गदर्शक ठरावा, हीच मनोकामना!
आपला, व्ही. एस. क्षीरसागर
(के सागर )
Reviews
There are no reviews yet.