आपल्या परीक्षेतील ८० टक्के प्रश्न ज्या पुस्तकावर आधारित असतात तोच हा आई-वडिलांनी अभ्यासलेला अन् विश्वासाने मुलांच्या हाती सोपविलेला अधिकाऱ्यांच्या पिढ्यानुपिढ्या घडविणारा ग्रंथराज….📚📖📘
के’ सागरीय…
सन २०१३ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विक्रीकर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व मंत्रालय सहायक पदांसाठी स्वतंत्रपणे घेतल्या जाणाऱ्या पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमात काही आवश्यक स्वरूपाच्या मूलभूत सुधारणा केल्या.
अनेकांना अभ्यासक्रमातील हा बदल धक्का-दायक वाटला असला तरी निरपेक्ष दृष्टिकोनातून पाहू गेले असता हा बदल विचारपूर्वक केलेला, विधायक व अधिक न्याय्य स्वरूपाचाच असल्याचे दिसून येते. पूर्वीच्या सामान्य क्षमता चाचणी या दीडशे प्रश्नांच्या व दीडशे गुणांच्या प्रश्नपत्रिकेऐवजी आपणास आता सामान्य क्षमता या शंभर प्रश्नांच्या व शंभर गुणांच्या प्रश्नपत्रिकेचा एका तासाच्या अवधीत यशस्वीपणे मुकाबला करावयाचा आहे.
या नव्या अभ्यासक्रमाचे विश्लेषण केले असता बव्हंशी पूर्वीच्याच अभ्यासक्रमाची व्याप्ती आयोगाने बाढविली असल्याचे व असे करताना सर्व विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांना यथायोग्य न्याय दिल्याचे प्रकर्षाने जाणवते. नवीन अभ्यासक्रमानुसार भारतीय अर्थव्यवस्था या एका व्यापक घटकाचा या अभ्यासक्रमात नव्याने समावेश केला गेला आहे.
महाराष्ट्रातील समाजसुधारक हा घटक अभ्यासक्रमातून वगळला असला तरी पूर्वीच्या ‘भारताचा सामान्य इतिहास’ या घटकाऐवजी ‘आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास’ हा घटक अभ्यासक्रमात समाविष्ट केला असल्याने त्या अंतर्गत महाराष्ट्रातील समाजसुधारक हा घटक आपणास अभ्यासावाच लागणार आहे.
आपल्या नवीन अभ्यासक्रमात भारताचा भूगोल या विषयाचा स्पष्टरीत्या समावेश नसला तरी भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) या घटकांतर्गत काही प्रमाणात का होईना भारताच्या भूगोलाचा अभ्यास आपणास करावाच लागणार
आहे. पूर्वीच्या अभ्यासक्रमातील अंकगणित या घटकाऐवजी आता अंकगणित व बुद्धिमापन चाचणी या संयुक्त अभ्यासघटकाचा अभ्यास करणे अनिवार्य ठरले आहे. नागरिकशास्त्र, सामान्य विज्ञान व चालू घडामोडी हे पूर्वीचे घटक नवीन अभ्यासक्रमातही कायम ठेवण्यात आले आहेत.
नव्या अभ्यासक्रमाच्या विस्तृत कक्षा, व्यापकता व सखोलता लक्षात घेऊन प्रस्तुतच्या जवळ-जवळ हजार डबल डेमीसाईज पृष्ठांच्या या ग्रंथराजाची रचना साकारली आहे. ही रचना साकारताना आपल्या अभ्यासक्रमातील सातही घटकांचा सखोल, व्यापक तरीही परीक्षाभिमुख परामर्श घेतला आहे. या संदर्भग्रंथाची रचना करताना आयोगाने अंगीकार-लेल्या नव्या दृष्टिकोनाची आणि आयोगाच्या प्रश्नांच्या नव्या धर्तीची जाण ठेवली असून त्याचे योग्य ते मान राखले आहे.
या संदर्भग्रंथातील पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश या प्रकरणाची रचना करताना प्रकाशनाच्या अस्मादिकांनी संस्करित केलेल्या प्रा. सु. प्र. दाते यांच्या ‘प्राकृतिक भूगोल’ या संदर्भाचा तद्वतच राज्य प्रशासन या प्रकरणाची रचना साकारताना अस्मादिकांनी संस्करित केलेल्या प्रा. व्ही. बी. पाटील लिखित भारतीय प्रशासन या ग्रंथांचा मुक्त संदर्भ घेतला आहे. त्यांचे ऋण येथे व्यक्त करणे मी अगत्याचे मानतो.
* Gat ‘B’ va Gat ‘C’ Sanyukta Purva Pariksha (Combine)
1. मानव विकास अहवाल 2021/2022/2023
2. जागतिक भूक निर्देशांक 2022
3. जागतिक शांतता निर्देशांक 2022
4. जागतिक विकास अहवाल 2022
5. लेटेस्ट सर्वे व रिपोर्ट्स 2022-23
₹395.00Original price was: ₹395.00.₹296.25Current price is: ₹296.25.
K'Sagar
All in One, Samanyadnyan, GK, General Knowledge, All Competitive exam, MPSC Pre, PSI-STI-ASO Pre, PSI-STI-ASO Main, Gat C Pre, Gat C Main, Group C Pre, Group C Main
₹295.00Original price was: ₹295.00.₹221.25Current price is: ₹221.25.
Author : Prof. Shenolikar & Dr. DeshpandeEdition : 6TH ISBN : 9788195052943Language : MarathiPublisher : K’sagar Publications Pune
Prof. Shenolikar & Dr. Deshpande
₹355.00Original price was: ₹355.00.₹266.25Current price is: ₹266.25.
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या चौथ्या पेपरमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगती या घटकाच्या अभ्यासक्रमानुसार समग्र विज्ञान तंत्रज्ञान सुधारित व
Reviews
There are no reviews yet.