“Sampurna Marathi संपूर्ण मराठी” has been added to your cart. View cart



Maharashtratil Samajsudharak महाराष्ट्रातील समाजसुधारक, साहित्यिक, भारतीय विचारवंत व अन्य महनीय व्यक्ती (के’सागर)
₹495.00 Original price was: ₹495.00.₹371.25Current price is: ₹371.25.

Prachin Bhartacha Ithiha प्राचीन भारताचा इतिहास (डॉ. पी. जी. जोशी)
₹285.00 Original price was: ₹285.00.₹213.75Current price is: ₹213.75.
Adhunik Bharatacha Itihas आधुनिक भारताचा इतिहास
₹275.00 Original price was: ₹275.00.₹206.25Current price is: ₹206.25.
87 in stock
Categories: History, History, History, History, History, History, Marathi UPSC, MPSC Optional Subjects, Paper I, Paper II, Specific Books
Description
केंद्र व राज्य लोकसेवा आयोगांच्या परीक्षांसाठी आदर्श ठरलेली मुद्देनिहाय व तक्तेनिहाय परीक्षाभिमुख रचना….📚📖📘
डॉ. हुकमचंद जैन यांच्या व्यासंगी अन् संशोधनपूर्ण लेखणीतून साकारलेल्या मूळ ग्रंथाचा मराठी अनुवाद….📚📖📘
आधुनिक भारताचा इतिहास
मूळ लेखक:डॉ.हुकमचंद जैन,मराठी अनुवाद:प्रा.म.म.मार्डीकर ✍️✍️✍️
मुद्देनिहाय-तक्तेनिहाय परीक्षाभिमुख रचना 📚📖📘
K सागरीय…
डॉ. हुकमचंद जैन. राजकीय महाविद्यालय कोटा येथील इतिहास विभागाचे प्रमुख. माझ्या मनाला भावलेल्या, मला बौद्धिकदृष्ट्या पटलेल्या अन् वैचारिकदृष्ट्या रुचलेल्या आधुनिक भारताच्या इतिहासा वरील ‘आधुनिक भारत का इतिहास- एक परिचयात्मक अनुशीलन’ या ग्रंथाचे लेखक.व्यक्तिगतरीत्या माझे एक सुहृद.एक सुहृदयी, व्यासंगी विद्वान पण तरीही विनम्र असे आगळे आणि वेगळे व्यक्तिमत्त्व.
इतिहास म्हणजे गतकाळात घडून गेलेल्या राजकीय घटनांची गोळाबेरीज, युद्धातील जय-पराजय व त्यांची मीमांसा आणि कर्तृत्ववान राज्यकर्त्यांची चरित्रमालिका अशी एक रूढ धारणा आहे. जैन सरांचा प्रस्तुतचा ग्रंथ या रूढ धारणेस छेद देणारा ठरावा. गतकालीन आणि त्यातही विशेषत्वाने राजकीय घटनांचे कालानुरूप संकलन करून इतिहासलेखक बनू पाहणाऱ्यांची फौज आज उभी राहत असताना आणि आपल्याबरोबरच आपल्या मागून येणाऱ्यांनाही मुळातच चुकीच्या असलेल्या संकल्पनेच्या खोल गर्तेत ढकलीत असताना, इतिहास म्हणजे नेमके काय आणि इतिहासलेखन नेमके कसे असावे, याचा आदर्श वस्तुपाठच जैन सरांनी घालून दिला आहे. लेखनामागे- विशेषत्वाने इतिहासलेखनामागे – एक विशिष्ट दृष्टी असणे किंबहुना,अनेक चुकीच्या दृष्टिकोनांची माऊगर्दी असताना एक निर्दोष दृष्टिकोन जपणे अगत्याचे असते. डॉ. जैन सर हा दृष्टिकोन सातत्याने जपतात.
आधुनिक भारताच्या इतिहासाला न्याय देणाऱ्या,या इतिहासातील घटनांचे आणि व्यक्तींचे वास्तववादी चित्रण अन् निष्पक्षपाती मूल्यमापन करणाऱ्या या मूळ हिंदी संदर्भग्रंथाचे मराठी भाषांतर करण्याचे आणि या ग्रंथाला यथायोग्य न्याय देण्याचे कार्य या ग्रंथाच्या दर्जा व गुणवत्तेमुळे खरेतर, अवघड बनलेले! हे काम प्रकाशनाचे एक सुहृद व व्यासंगी लेखक-प्राध्यापक अन् विचारवंत म.म.मार्डीकर यांनी परिश्रमपूर्वक केले आहे.
आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या प्रागतिक आणि चिकित्सक दृष्टिकोनाचे एक नवे दालन महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना आणि इतिहास विषयाच्या अध्यापक प्राध्यापकांना मुक्त करून देण्याची जी संधी आज मला लाभली आहे; त्याबद्दल जैन सरांचे तद्वतच मार्डीकर सरांचे ऋण व्यक्त करणे व त्यांच्या ज्ञानास आणि लेखनकार्यास अभिवादन करणे,
हे मी माझे कर्तव्य समजतो.
आपलाच,
व्ही. एस. क्षीरसागर
(K’Sagar)
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #mpschistory #mpschistorymcqs #maharashtrahistory #upschistory #upschistoryoptional #indianhistory #graduationstudent #translated #mpscupsc #upschistory
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.