You must have an order with a minimum of 1 pcs to place your order, your current order total is 0 pcs.
Police Shipai Chalak Bharti Margdarshak
₹325.00 Original price was: ₹325.00.₹162.50Current price is: ₹162.50.
Postal Seva Bharti Pariksha
₹295.00 Original price was: ₹295.00.₹163.14Current price is: ₹163.14.
Rajkiya Siddhant Ani Bhartiya Rajkaran
₹450.00 Original price was: ₹450.00.₹315.00Current price is: ₹315.00.
Garge, Ghangrekar, Patil, Kshirsagar
Rajkiya Siddhant, Bhartiya Rajkaran
Categories: Political Science, Political Science, Specific Books
Description
महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा मुख्य परीक्षेतील पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स
या वैकल्पिक विषयाच्या पेपर-१ मधील विभाग १च्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ….
विषय कोड १०४९
के’सागरीय
प्रा. व्ही. बी. पाटील, राज्यशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक आणि प्राध्यापक, व्यक्तीशः माझे ज्येष्ठ स्नेही व के’सागर परिवाराचे एक सुहृद. प्रकाशनाची काही पुस्तके त्यांच्या अभ्यासू लेखणीतून स्वतंत्रपणे साकारलेली तर काही पुस्तके त्यांनी मजबरोबर संयुक्तरीत्या लिहिलेली.
भारताची राज्यघटना साध्या-सोप्या शब्दांत, भारतीय राज्यव्यवस्था व भारतीय प्रशासन ही पुस्तके म्हणजे व्ही. बी. च्या व्यासंगी लेखणीतून साकारलेली अभ्यासशिल्पेच होत!
फर्गसन कॉलेजचे माजी प्राचार्य दिवंगत डॉ. वि. मा. बाचल व प्रकाशनाचेही असेच हृद्य संबंध. अस्मादिकांनी त्यांच्या सोबत लिहिलेला भारतीय राज्यघटना आणि राजकीय व्यवहार हा संदर्भही विद्यार्थी मित्रांना भावलेला!
अस्मादिकांचं आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील समाजसुधारक आणि इतर अनेक संदर्भमहाराष्ट्रीय तरुणांना भावलेले आणि आयोगाच्या परीक्षांकरिता उपयुक्त सिद्ध झालेले.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या व सुधारित अभ्यासक्रमानुसार पूर्वीच्या प्रत्येकी १५० गुणांच्या सामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सऐवजी प्रत्येकी २५० गुण असलेल्या सामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सचा सामना आता आपणास करावयाचा आहे.
राज्य लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचे पूर्वीचे वस्तुनिष्ठ स्वरूपही आता परंपरागत झाले असून वस्तुनिष्ठ माहितीबरोबरच विश्लेषणात्मक स्वरूपाचा व विचाराला चालना देणारा आणि समीक्षणात्मक अभ्यासही परीक्षेच्या व नवीन अभ्यासक्रमाच्या पार्श्वभूमीवर आता महत्त्वाचा ठरलेला आहे.
प्रस्तुतचा संदर्भ केंद्र व राज्य लोकसेवा आयोगांच्या मुख्य परीक्षांमधील या सामान्य अध्ययनाच्या दुसऱ्या पेपरचा व केंद्र व राज्यसेवा पूर्व परीक्षेतील सामान्य क्षमता चाचणी अंतर्गत
भारतीय राज्यघटना व आनुषंगिक अभ्यासक्रम लक्षात घेऊन रचना केला आहे. या परीक्षांचा अभ्यास उत्तम प्रकारे होऊन विद्यार्थ्यांना भरपूर गुण मिळविता यावेत, हा या पुस्तकाच्या रचने-मागील उद्देश होय.
यास्तव अस्मादिकांनी पूर्णतः नव्याने लिहिलेली २५-२६ प्रकरणे व राज्याच्या व केंद्राच्या पूर्व परीक्षेस व इतर स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरतील, असे महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न, व्ही. बी. पाटील सरांच्या व अस्मादिकांच्या वर उल्लेख केलेल्या ग्रंथांमधून अस्मादिकांनी संस्करित, सुधारित व संपादित केलेला अभ्यासक्रमांतर्गत येणारा मजकूर यांचा समावेश या ग्रंथात केलेला आहे. त्यामुळे या संदर्भाचा दर्जा व उपयुक्तता निश्चितच वाढली आहे.
आयोगाच्या नव्या धतींनुसार अन् वाढत्या काठिण्यपातळीनुसार रचना केलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश करून पुस्तकाची गुणवत्ता व उपयुक्तता वाढविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
प्रकरण संपल्यावर जेथे जेथे एखादा कॉलम मोकळा असेल तेथे तेथे केंद्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व परीक्षेत येऊन गेलेल्या निवडक व महत्त्वाच्या प्रश्नांचे चौकोन दिले आहेत.
निरपेक्ष भावनेने ज्ञानयज्ञ अखंड तेवत ठेवणारे एक निरपेक्ष व्यक्तिमत्त्व माझे जुने स्नेही व सहद-प्रा. प्रवीण चव्हाण यांनी या संदर्भाचे हस्तलिखित तपासून अनेक मौलिक सूचना केल्या. त्यामुळे पुस्तकाची उपयुक्तता वाढली असून दर्जाही उंचावला आहे. त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करणे मी माझे कर्तव्य मानतो.
विद्यार्थिमित्रांना अस्मादिकांचा हा प्रयत्न निश्चितच भावेल व आमची ही मनापासूनची धडपड त्यांच्या उपयोगी येईल, याची खात्री वाटते.
एवम्, के’सागरीय संदर्भमालेतील मेरुमणी ठरावा असा हा संदर्भ मित्रांनो, मी तुमच्या हाती सोपवीत आहे!
हार्दिक शुभेच्छांसह !!
आपलाच,
व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025#mpscguidance #upscguidance #mpscmains#mpscbooklist#upscbooklist #mpscprepration #upscpreparation #mpschistory #graduationstudent #universityexam #historysuggestion #mpscupsc #politicalscience #politicalscienceexam #politicalsciencesyllabus #politicalscienceugc #politicaldebate #political #politicalanalysis
#upscpolity #mpscpolity #optionalupsc #sociology
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Download
Rajkiya Siddhant Ani Bhartiya Rajkaran
Related products
Adhunik Bharatacha Itihas आधुनिक भारताचा इतिहास
Anivarya Marathi सुधारित अभ्यासक्रमानुसार
Bhartachi rajyaghatna & Rajkiya wyavahar
CSAT Paper-2 Samagra Margadarshk पेपर-२ समग्र मार्गदर्शन
Maharashtracha Samajik-Sanskrutik Itihas महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास (प्रा. ह. श्री. शेणोलीकर व डॉ. प्र. न. देशपांडे)
Maharashtratil Panchayatraj महाराष्ट्रातील पंचायतराज
Prof. V. B. Patil
MPSC Pre, MPSC Main, Gat B Pre Exam, Gat C Combine Pre Exam, All Competitive Exam
<iframe width="560" height="315" src="https://www.youtube.com/embed/_SnjEnMW47U?si=kL68dzluN3cELVX8" title="YouTube video player" frameborder="0" allow="accelerometer; autoplay; clipboard-write; encrypted-media; gyroscope; picture-in-picture; web-share" referrerpolicy="strict-origin-when-cross-origin" allowfullscreen></iframe>

Reviews
There are no reviews yet.