“Adhunik Bhartacha Ithihas Wastunishtha Swarupat-आधुनिक भारताचा इतिहास वस्तुनिष्ठ स्वरूपात – राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर-1 करिता नव्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ (यूपीएससीच्या परीक्षांमधील प्रश्नांवर आधारित) (डॉ. हुकमचंद जैन) (संस्करण : के’सागर)” has been added to your cart. View cart

Visavya Shatkatil Maharashtra (1901-1914) - Khand 1 विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९०१-१९१४) - खंड १
₹365.00 Original price was: ₹365.00.₹273.75Current price is: ₹273.75.

Visavya Shatkatil Maharashtra (1921-1929) - Khand 3 विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९२१-१९२९) - खंड ३
₹225.00 Original price was: ₹225.00.₹168.75Current price is: ₹168.75.
Visavya Shatkatil Maharashtra (1914-1920) – Khand 2 विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९१४-१९२०) – खंड २
₹325.00 Original price was: ₹325.00.₹243.75Current price is: ₹243.75.
Author : Y. D. Phadke
Edition : 4th : 2024
ISBN : 9788195914197
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Y. D. Phadke
192 in stock
Categories: History, History, History, History, History, History, Marathi UPSC, MPSC Optional Subjects, Paper I, Paper II, Specific Books
Description
Visavya Shatkatil Maharashtra (1914-1920) – Khand 2 विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९१४-१९२०) – खंड २
पुनर्मुद्रणाच्या निमित्ताने…
विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचे पहिले दोन खंड १५ मार्च, १९८९ रोजी प्रकाशित झाले. त्यांचे पुनर्मुद्रण १६ वर्षांनंतर होत आहे. आतापर्यंत या बृहत्प्रकल्पातील १९०१ ते १९४७ पर्यंतचे एकूण ५ खंड प्रकाशित झाले आहेत. सन १९४८ ते १९६० या कालखंडासंबंधीचा सहावा खंड मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित केला जाणार आहे. याच कालखंडात मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषकांना लढा द्यावा लागला. त्याबद्दलचा सातवा खंड सध्या मी लिहीत आहे.
मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाची अस्सल साधने शोधण्यात आणि ती संपादित करून प्रसिद्ध करण्यासाठी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, वासुदेवशास्त्री खरे, द. बा. पारसनीस, रियासतकार सरदेसाई, द. वि. आपटे, त्र्यं. शं. शेजवलकर, ग. ह. खरे, सेतुमाधराव पगडी वगैरेंनी विसाव्या शतकात अपार परिश्रम केले. राजवाड्यांनी संपादित केलेल्या “मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे तेरा व चौदा हे दोन खंड पाच-सात वर्षे भिजत पडून १९१७ साली “एकदाचे कसेबसे बाहेर पडले” ‘इतिहास आणि ऐतिहासिक’ मासिकात त्यासंबंधी राजवाड्यांनी लिहिले आहे, “या खंडांच्या छपाईचा सर्व खर्च अच्युतराव भट यांनी सोसला. प्रती दहा पाचाहून जास्त खपणार नाहीत, हे उघड आहे. इतिहाससाधनांची पुस्तके कोणत्याही देशात कादंबऱ्यांच्या पुस्तकांसारखी खपत नाहीत, हे सांगावयास नकोच. तेव्हा सर्व खर्च बुडीत होणार हे डोळ्यांस दिसत असून रा. भट यांनी हे खंड काय म्हणून प्रकाशिले ? इतिहासाच्या अभिमानाने हे सर्व भटांनी केले यात संशय नाही.” (मु. ब. शहा (संपादक), समग्र राजवाडे साहित्य; खंड ९, पृ. १४५) श्री विद्या प्रकाशन संस्थेचे दा. दि. ऊर्फ मधुकाका कुलकर्णी यांनी मी लिहिलेल्या विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे ५ खंड नफ्या- ऐकताचा विचार न करता प्रकाशित केले.
के’सागरीय
आदरणीय डॉ. य. दि. फडके. फडकेसर देव मानतात की नाही, मला माहिती नाही. मी मात्र त्यांना माझे विद्यादैवत ज्ञानदैवत मानतो. महाराष्ट्राला ललामभूत ठरलेल्या या साहित्यिकास व ज्येष्ठ विचारवंतास मराठी साहित्याच्या सेवेतच देव दिसत असावा !
विवेकनिष्ठ परंतु मर्मावर बोट ठेवणारी लेखणी; परखड परंतु तरीही संयमशील अशी वैचारिक अभिव्यक्ती, धर्मनिरपेक्षता व समाजवादाप्रती बांधिलकी अन् या बांधिलकीशी प्रामाणिक असलेले लेखन आणि एकूणच विवेकशीलतेशी, संयमशीलतेशी व ध्येयनिष्ठेशी प्रामाणिक असलेली जीवनाची वाटचाल याच शब्दांत सरांचा परिचय करून द्यावा लागेल. सरांची विचारधारा समाज-वादाशी बांधिलकी सांगणारी असली तरी या धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्त्वानेसमाजवादहाचएक धर्मसमजून चालण्याची किंवा समाजवादाला धर्माची कळा आणण्याची गल्लत प्रकर्षाने टाळली आहे.
अशा या ज्ञानतपस्व्याच्या अथक् परिश्रमातून आणि पृथक् संशोधनातून साकारलेल्या ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्र’ या पंचखंडात्मक संदर्भ ग्रंथाच्या पहिल्या दोन खंडांचे पुनर्मुद्रण करण्याचे भाग्य प्रकाशनास लाभले आहे. फडकेसरांनी प्रस्तुतचे खंड लिहिताना ते कोणत्या परीक्षांना संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त ठरावेत असा विशिष्ट आणि मर्यादित दृष्टिकोन निश्चितच बाळगला नव्हता. तथापि, या ग्रंथांना राज्य व केंद्र लोकसेवा आयोगांच्या परीक्षांच्या दृष्टिकोनातून संदर्भ ग्रंथ म्हणून असलेले मोल या परीक्षांचा तहहयात विद्यार्थी आणि सरांच्या ग्रंथांचा तहहयात अभ्यासक म्हणून मी निश्चितच जाणतो.
परीक्षार्थी-विद्यार्थी आणि एकूणच अभ्यासू-जिज्ञासू मराठी वाचकांना सरांच्या पावलांनी मळलेल्या या पाऊलवाटेने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात प्रवेश करणे निश्चितच भावेल, याची त्या पाऊलवाटेवरून वारंवार प्रवास केल्याने मला खात्री वाटते.
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(के’सागर)
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscmarathi #upscmarathi #mpscguidance #upscguidance #mpscmains
#mpscbooklist #upscbooklist #mpscprepration #upscpreparation #mpschistory #upschistory #upschistoryoptional #graduationstudent #indianhistory #universityexam #upsc #mpsc #historysuggestion #mpscupsc #historyofmaharashtra
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Download
Reviews
There are no reviews yet.