Visavya Shatkatil Maharashtra (1914-1920) – Khand 2 विसाव्या शतकातील महाराष्ट्र (१९१४-१९२०) – खंड २
पुनर्मुद्रणाच्या निमित्ताने…
विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचे पहिले दोन खंड १५ मार्च, १९८९ रोजी प्रकाशित झाले. त्यांचे पुनर्मुद्रण १६ वर्षांनंतर होत आहे. आतापर्यंत या बृहत्प्रकल्पातील १९०१ ते १९४७ पर्यंतचे एकूण ५ खंड प्रकाशित झाले आहेत. सन १९४८ ते १९६० या कालखंडासंबंधीचा सहावा खंड मौज प्रकाशनातर्फे प्रकाशित केला जाणार आहे. याच कालखंडात मुंबईसह महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी भाषकांना लढा द्यावा लागला. त्याबद्दलचा सातवा खंड सध्या मी लिहीत आहे.
मध्ययुगीन महाराष्ट्राच्या इतिहासाची अस्सल साधने शोधण्यात आणि ती संपादित करून प्रसिद्ध करण्यासाठी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे, वासुदेवशास्त्री खरे, द. बा. पारसनीस, रियासतकार सरदेसाई, द. वि. आपटे, त्र्यं. शं. शेजवलकर, ग. ह. खरे, सेतुमाधराव पगडी वगैरेंनी विसाव्या शतकात अपार परिश्रम केले. राजवाड्यांनी संपादित केलेल्या “मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांचे तेरा व चौदा हे दोन खंड पाच-सात वर्षे भिजत पडून १९१७ साली “एकदाचे कसेबसे बाहेर पडले” ‘इतिहास आणि ऐतिहासिक’ मासिकात त्यासंबंधी राजवाड्यांनी लिहिले आहे, “या खंडांच्या छपाईचा सर्व खर्च अच्युतराव भट यांनी सोसला. प्रती दहा पाचाहून जास्त खपणार नाहीत, हे उघड आहे. इतिहाससाधनांची पुस्तके कोणत्याही देशात कादंबऱ्यांच्या पुस्तकांसारखी खपत नाहीत, हे सांगावयास नकोच. तेव्हा सर्व खर्च बुडीत होणार हे डोळ्यांस दिसत असून रा. भट यांनी हे खंड काय म्हणून प्रकाशिले ? इतिहासाच्या अभिमानाने हे सर्व भटांनी केले यात संशय नाही.” (मु. ब. शहा (संपादक), समग्र राजवाडे साहित्य; खंड ९, पृ. १४५) श्री विद्या प्रकाशन संस्थेचे दा. दि. ऊर्फ मधुकाका कुलकर्णी यांनी मी लिहिलेल्या विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे ५ खंड नफ्या- ऐकताचा विचार न करता प्रकाशित केले
Reviews
There are no reviews yet.