You must have an order with a minimum of 1 pcs to place your order, your current order total is 0 pcs.

Jagtik Vyavharat Bharat
₹165.00 Original price was: ₹165.00.₹123.75Current price is: ₹123.75.

An Introduction to Sociology - समाजशास्त्र परिचय
₹325.00 Original price was: ₹325.00.₹243.75Current price is: ₹243.75.
Sampoorna Samajshastra
₹265.00 Original price was: ₹265.00.₹198.75Current price is: ₹198.75.
K’Sagar & Prof. V. B. Patil
57 in stock
Description
केंद्र लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा पदवी व पदव्युत्तर परीक्षा तद्वतच सेट-नेट परीक्षांकरिता उपयुक्त असा सर्वसमन्वयक व सर्वसमावेशक संदर्भ ग्रंथ..
के’सागरीय…
दहा-बारा वर्षांपूर्वी केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या वैकल्पिक विषयांवर अभ्यासक्रमानुसार रचना केलेली मराठी माध्यमातील पुस्तके उपलब्ध नव्हती आणि आजही अपवादानेच उपलब्ध आहेत. या विषयांचा अभ्यास करताना विद्यार्थिमित्रांना कोण-कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, याचा अनुभव मी स्वतःही घेतलेला आहे. या अडचणींतून प्रेरणा घेऊनच केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या काही निवडक वैकल्पिक विषयांवर मराठी माध्यमातून अभ्यासक्रमानुसार पुस्तके लिहिण्याचे मी ठरविले होते. त्यानुसार या संकल्पमालेतील ‘समाजशास्त्र’ या विषयावरील प्रस्तुतच्या पुस्तकाची पहिली आवृत्ती दहा-बारा वर्षांपूर्वीच प्रा. व्ही. बी. पाटील या माझ्या व्यासंगी मित्राच्या सहकार्यातून साकारली. तद्नंतर या पुस्तकाच्या काही आवृत्त्या निघाल्या, पुनर्मुद्रणेही झाली. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांच्या परीक्षांचा अभ्यासक्रम लक्षात घेऊनच महाविद्यालयीन परीक्षांचा अभ्यासक्रम आखला जावा, असा एक विचार पुढे आला.
बव्हंशी वास्तवातही आला.
या सर्व पार्श्वभूमीवर, पदवी वा पदव्युत्तर परीक्षांचा अभ्यास करीत असतानाच केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षांतील वैकल्पिक विषयांची परिपूर्ण तयारी व्हावी आणि ही शिदोरी बरोबर घेऊनच विद्यार्थिमित्रांना केंद्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयांची अधिक परिपूर्ण तयारी करता यावी, केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांची हा अभ्यास करीत असतानाच पदव्युत्तर परीक्षेचीही तयारी व्हावी; तद्वतच संबंधित विषयांचे प्राध्यापक होऊ इच्छिणाऱ्यांना सेट-नेट परीक्षांची तयारी करण्यास उपयुक्त ठरावे, अशा समन्वयित दृष्टिकोनातून प्रस्तुतच्या ग्रंथाची रचना साकारली आहे.
प्रा. व्ही. बी. पाटील यांच्या सहकार्याने साकारलेल्या मूळ पुस्तकाच्या पायावरच या संदर्भग्रंथाची ही नवी व अधिक भव्य वास्तू उभी राहिली आहे. व्यापक स्वरूपाच्या या संदर्भ ग्रंथाची रचना करताना प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यांचेही मोलाचे सहकार्य मला लाभले आहे. प्रा. पाटील व प्रा. कुलकर्णी या दोहोंचाही मी ऋणी आहे.
साध्या-सोप्या व ओघवत्या के’ सागरीय भाषाशैलीतील हा संदर्भ आपणास विषय मुळातूनच समजण्यास व परीक्षेत उत्तम गुण मिळविण्यास साहाय्यभूत ठरेल व आपला यशोमार्ग अधिक प्रशस्त करील या खात्रीसह हा संदर्भ आपल्या हाती सोपवीत आहे. शुभेच्छांसह !!
आपलाच,
व्ही. एस. क्षीरसागर (K’Sagar)
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist#upscbooklist #mpscprepration #upscpreparation #psistiaso
#comptativeexam #competative_exam #netexampreparation #set #setexampaper1 #setexampreparation #setexamcoaching #mpscoptional #optionalupsc #sociology
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Download
Reviews
There are no reviews yet.