समग्र समाजकल्याण अध्ययन
डॉ. प्राजक्ता टांकसाळे
लेखिकेने एम. एस. डब्ल्यु ही पदवी नागपूर विद्या- पीठातून गुणानुक्रमे प्रथम क्रमांकाने प्राप्त केली आहे. त्यांनी इतिहास विषयात पुणे विद्यापीठाची पदवीही प्राप्त केली आहे. इ. स. १९८९ मध्ये त्यांना अंधकल्याणाशी संबंधित विषयावर पीएच. डी. मिळालेली आहे.
त्या मातृसेवा संघ, इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्क येथे गेल्या ३० वर्षे प्राध्यापिका या नात्याने कार्य केले. विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत लघुशोध- प्रबंध.
मासिके व नियतकालिके यांत नियमित लिखाण. पालक- बालक मेळावे, शासकीय व अशासकीय संस्थांच्या प्रशिक्षण व उद्बोधन कार्यक्रमात तज्ज्ञ या नात्याने सहभाग. व्याख्यानांच्या माध्यमातून व विविध संस्थांशी वेगवेगळ्या रूपाने संलग्न राहून लेखिका आपल्या क्षेत्रात क्रियाशील योगदान देत आहेत.
त्या पीएच. डी. च्या मान्यताप्राप्त मार्गदर्शिका आहेत. शालेय समाजकार्य, प्रौढशिक्षण, संस्कार केंद्र, नेत्रदान अशा विविध क्षेत्रांत त्यांनी प्रत्यक्ष कार्याद्वारे सातत्याने योगदान दिले आहे.
समाजकार्याच्या क्षेत्रात लेखिका तज्ज्ञ असून समाजकार्य विषयाचा त्यांचा व्यासंग गाढा आहे. प्रस्तुतच्या पुस्तकातून त्यांच्या गाढ्या व्यासंगाचे मनोज्ञ दर्शन घडावे. समाजकार्य विषयावरील त्यांची नऊ पुस्तके मराठीतून प्रकाशित झाली आहेत.
Reviews
There are no reviews yet.