Ksagar Prakrutik Bhugol
मूळ संदर्भाची सुधारित स्वरूपातील ही सातवी अद्ययावत आवृत्ती आपल्या हाती सोपविताना केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या पूर्व व मुख्य परीक्षांमधील सामान्य अध्ययनातील प्राकृतिक भूगोलविषयक अभ्यासक्रमास, राज्यसेवा मुख्य परीक्षा (नवीन अभ्यासक्रम २०२५) भूगोल या वैकल्पिक विषयांतर्गत (Code 1027) विहित केलेल्या प्राकृतिक भूगोलविषयक अभ्यासक्रमास तद्वतच केंद्र सेवा मुख्य परीक्षेतील भूगोल या वैकल्पिक विषयांतर्गत प्राकृतिक भूगोल विषयक अभ्यासक्रमास जास्तीत जास्त न्याय देण्याचा यथोचित प्रयत्न या सर्वसमावेशक संदर्भात केला आहे.
पाचव्या विभागातील प्रकरण ४, प्रकरण १० व प्रकरण १४ या प्रकरणांचे लेखन नव्याने अभ्यासू व व्यासंगी नवोदित लेखिका पूनम पवार यांनी उत्तमरीत्या केले आहे. त्यांचा येथे नामनिर्देश करणे मी अगत्याचे मानतो.
महत्त्वाच्या प्रश्नांच्या गाभ्याशी स्थिरावणारी प्रकरण रचना; थिंकिंग, ग्रास्पिंग आणि फॅक्ट्स् अशा तिन्ही प्रकारच्या प्रश्नांचा यशस्वी सामना करता येईल अशा प्रकारे विषयाची केलेली गुंफण; जास्तीत-जास्त अद्ययावतता, अचूकता आणि नेहमीची साधी सोपी भाषा ही के’ सागरीय वैशिष्ट्ये जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी याही पुस्तकातून केला आहे.
शुभेच्छांसह !!
Reviews
There are no reviews yet.