“Maharashtracha Samajik-Sanskrutik Itihas महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास (प्रा. ह. श्री. शेणोलीकर व डॉ. प्र. न. देशपांडे)” has been added to your cart. View cart



Prachin Bhartacha Ithiha प्राचीन भारताचा इतिहास (डॉ. पी. जी. जोशी)
₹285.00 Original price was: ₹285.00.₹213.75Current price is: ₹213.75.

Prachin Bharat प्राचीन भारत : एक ऐतिहासिक रूपरेखा (लेखक : प्रा. डी. एन. झा.) (मराठी अनुवाद : प्रा. मा. कृ. पारधी, संस्करण : के’सागर)
₹195.00 Original price was: ₹195.00.₹146.25Current price is: ₹146.25.
Prachin Bharat प्राचीन भारत (प्रा. तांबे-काटदरे) (संस्करण-सुधारणा : के’सागर)
₹265.00 Original price was: ₹265.00.₹198.75Current price is: ₹198.75.
94 in stock
Categories: History, History, History, MPSC Optional Subjects, Specific Books
Description
Prachin Bharat प्राचीन भारत (प्रा.तांबे-काटदरे) (संस्करण-सुधारणा : के’सागर)
पदवी व पदव्युत्तर परीक्षा,केंद्र व राज्य लोकसेवा आयोगांच्या आणि इतर स्पर्धा परीक्षेत इतिहास ह्या विषयात जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी
तसेच अध्यापक-प्राध्यापक ह्यांना अत्यंत उपयुक्त संदर्भ…📚📖📘
लेखक तांबे-काटदरे ह्यांच्या व्यासंगी लेखणीतून साकारलेल्या मूळ संदर्भाचे के’सागर सरांनी केलेले सुधारण व संस्करण📚📖📘
के’सागरीय…
अस्मदिकांच्या जन्माच्याही जवळ जवळ दशकभर अगोदर प्रकाशित झालेले हे पुस्तक ! मराठी भाषेत शैक्षणिक पुस्तके जेव्हा जवळजवळ नव्हतीच, तेव्हाचा हा काळ. एखाद्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी दिशादिग्दर्शन करणारी पाऊलवाटही नसावी, तो हा काळ. मराठीतील पारिभाषिक शब्दांची निर्मितीही अद्याप व्हावयाची होती आणि सर्वच प्रकारच्या संदर्भाची वानवा होती, असा हा काळ. अशा या समयी होतकरू म्हणाव्या अशा वयातील दोन तरुण प्राध्यापकांनी अंधाऱ्या रस्त्यावरून मार्गक्रमण करून प्राचीन भारताच्या इतिहासावर मराठी भाषेच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचे एक महान कार्य केले. मराठी भाषेत शैक्षणिक पुस्तके उपलब्ध व्हावीत म्हणून केल्या गेलेल्या सुरुवातीच्या प्रयत्नापैकी हा एक यशस्वी प्रयत्न होता.
माझ्या पदव्युत्तर अभ्यासाच्या कालखंडात आणि लोकसेवा आयोगाच्या परीक्षांना मी सामोरे जाण्याच्या काळात माझ्या हाती आलेलं, मला भावलेलं असं हे पुस्तक ! खरे तर, त्या काळीही हे पुस्तक जुन्या आणि उपलब्ध होऊ न शकणाऱ्या पुस्तकांच्या मालिकेतीलच एक होते. प्राचीन भारताच्या इतिहासाचा जो अल्प स्वल्प अभ्यास मी केला आणि या विषयातील जे काही ज्ञान माझ्या पदरात पडले त्याचे फार मोठे श्रेय या अक्षरशिल्पास द्यावे लागेल. माझ्या अगोदरच्या पिढीने अभ्यासलेला हा उत्कृष्ट अन् उपयुक्त ग्रंथ अभ्यासण्यासाठी उपलब्ध व्हावा म्हणून मलाही बरीच यातायात करावी लागली होती. तेव्हाच मनात कुठेतरी ज्ञानाचा हा अमोल ठेवा जतन करून, संस्करित करून पुढील पिढीच्या हाती सोपवावा-आपल्याला मिळालेल्या या ज्ञानामृताचे आकंठ प्राशन करण्याचा आनंद या नव्या पिढीलाही मिळावा हा विचार मनात रुजला होता-मनावर बिंबला होता- मनात रूंजी घालत होता.
खरे तर, जवळ जवळ सात दशकांपूर्वी हा ग्रंथ लिहिला गेलेला. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले. शैक्षणिक मराठी सारस्वतही पारिभाषिक शब्दांनी समृद्ध झालेले. आज सात दशकांनंतर हे पुस्तक नव्या पिढीच्या हाती द्यावयाचे तर उलटलेल्या वेगवान कालखंडाचा विचार करता काही सयुक्तिक बदल करून, काही भाग वगळून तर काही भागाचे लेखन वा पुनर्लेखन करून आणि आवश्यक तेथे संपादन-संस्करण करून नव्या पिढीलाही आकलेल आणि भावेल अशा स्वरूपातच ते त्यांच्या हाती सोपविणे गरजेचे होते. वेगळ्या शब्दांत सांगावयाचे तर, या ग्रंथरत्नास आजच्या काळाच्या कोंदणात बसविणे आवश्यक होते आणि अपरिहार्यही होते. यथाबुद्धी व यथाज्ञान तो प्रयत्न येथे मी केला आहे.
तांबे-काटदरे या लेखकद्वयांनी अंधाऱ्या वाटेने प्राचीन भारताच्या इतिहासाचा घेतलेला हा परामर्श आपल्या यशाच्या वाटा निश्चितच प्रकाशमय करील, या यथार्थ अपेक्षेसह कालच्या-परवाच्या पिढीतील हा ज्ञान ठेवा आजच्या उद्याच्या नव्या पिढीच्या-हाती सोपविताना मला कृतार्थतेचा यथार्थ आनंद होत आहे.
आदरणीय लेखकद्वयांचा हा दुर्मिळ ग्रंथराज नव्या व संस्करित स्वरूपात प्रकाशित करण्याची माझी संकल्पना ज्यांच्या सहकार्यामुळे आज वास्तवाचे रूप ल्याली आहे त्या जुन्या पिढीतील जाणत्या प्रकाशक राजाचे आदरणीय अ. ज. प्रभू यांचे ऋण येथे व्यक्त करणे मी माझे परम कर्तव्य मानतो. त्यांच्या प्रेरणेने अन् आशिर्वादानेच हा प्रकल्प आज सिद्धीस गेला आहे.
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(के’सागर)
⚫ केंद्र व राज्य लोकसेवा आयोग परीक्षा / Kendra & Rajya Lokseva Ayog
⚫ लोकसेवा आयोग परीक्षा / Lokseva Ayog Exam
⚫ पदवी व पदव्युत्तर परीक्षा / Graduation / Postgraduation Exam
⚫ महाराष्ट्र लोकसेवा आयोग / MPSC
⚫ सामान्य क्षमता चाचणी पेपर / Genral Study Paper
⚫ सामान्य अध्ययन पेपर १ / GS Paper 1
⚫ MPSC / UPSC इतिहास / MPSC / UPSC History
⚫ अध्यापक-प्राध्यापक / UGCNET Exam,UGCJRF Exam,CSIRNET Exam,JRF EXAM,SET Exam,NET Exam,NET-SET Exam
⚫ के’सागर MPSC / UPSC इतिहास संदर्भ / k’Sagar MPSC / UPSC References
⚫ प्राचीन भारत / Acient India
⚫ विद्यापीठीय परीक्षा इतिहास अभ्यासक्रम / University Exam History Syllabus
⚫ स्पर्धा परीक्षा इतिहास विषय / competitive Exam History Subject
⚫ विद्यार्थी प्रिय संदर्भ / Best Seller Book
#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #mpschistory #mpschistorymcqs #maharashtrahistory #upschistory #upschistoryoptional #indianhistory #graduationstudent #translated #paper1 #comptativeexam #competative_exam #mpscupsc #mpschistory #mpschistorymcqs #acienthistory #ugcnet #ugcnetexam #ugcnetpreparation #ugcjrf #csirnet #csirnetexam #acient
Reviews (0)
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Related products
Bhartachi rajyaghatna & Rajkiya wyavahar
Sampoorna CSAT Paper – 2 संपूर्ण CSAT
General Knowledge 5500 Vastunisth Prashan Uttarsahit
India Since Independence
We have a lot of Indian books in our store, which are often bought by Greek online casino players. 99 pieces are available at a price of 545.00, but for fans of καζινο online there is a valid discount of 408.75. The Greek players of the online casino can add the books they like to the basket and read the reviews according to the reviews.
Author : Bipin Chandra
Translator : M.K. Pardhi , V.C.Phadke , Dr. Arun Joshi , P.M.Natu , V.S.Kshirsagar
Editor : K’sagar
ISBN : 9788192778945
Edition : 2023-24
Language : Marathi
Publisher : K’sagar Publications
Bipan Chandra
Buying the book India since Independence for only 408.75 ₹ online casino players save as the full price of the book is 545.00 ₹. In addition, along with the book India since independence, readers can receive a bonus on the royal vegas casino. Hurry up to buy India since Independence as there are only 99 left in stock and this will be a useful book for online casino players.
India Since Independence, History, K'Sagar Book
Reviews
There are no reviews yet.