महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत सन २०२4 मध्ये राज्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस शिपाई चालक पदांची भरती होत आहे. पोलीस शिपाई चालक पदाच्या लेखी अभ्यासक्रमात एकूण ५ घटक समाविष्ट असून परीक्षा एकूण १०० गुणासाठी आहे. परीक्षेच्या अभ्यासक्रमात ‘मोटारवाहन चालविणे व वाहतुकी- बाबतचे नियम’ हा घटक समाविष्ट असून त्यावर आधारित साधारण २० से २५ प्रश्न विचारले जातात. तसेच त्यात अंकगणित, बुद्धिमापन चाचणी, मराठी व्याकरण व सामान्य ज्ञान हे घटकही अंतर्भूत आहेत. साधारणपणे मोटारवाहन चालविणे या घटकाच्या व्यतिरिक्त इतर घटकांचा अभ्यास विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना करीत असतात; पण पोलीस शिपाई चालक पदाच्या परीक्षेत यशस्वी होण्यासाठी मोटारवाहन नियम व कायदे यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे करणे आवश्यक आहे.
2020
“मोटारवाहन चालविणे व वाहतुकीबाबतचे नियम’ या घटकास अनुसरून डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांनी सदर पुस्तकातील विविध प्रकरणे आपआपसात विभागून घेऊन त्यांचे लेखन केले आहे. डॉ. शशिकांत अन्नदाते यांनी सदर पुस्तकातील १ ते ४ प्रकरणांचे लेखन अत्यंत अभ्यासपूर्ण शैलीने केले आहे. स्वाती शेटे यांनी सदर पुस्तकातील ५ ते १५ प्रकरणांचे लेखन केले असून त्यांनी सदर प्रकरणे लिहिताना विविध संदर्भाचा उपयोग केला आहे. स्वाती शेटे यांनी सदर पुस्तकातील माहिती लेखन करताना ती अतिशय मुद्देशीर लिहिली आहे. तसेच सदर पुस्तकातील प्रकरण १३ मध्ये सरावासाठीचे वस्तुनिष्ठ
प्रश्न आणि प्रवारण १४ मध्ये २०२५ मध्ये झालेल्या पोलीस शिपाई चालक परीक्षेतील वस्तुनिष्ठ प्रश्न लिहिताना स्वाती शेटे यांनी भरपूर कष्ट घेतले आहेत. दोन्हीही लेखकांनी लेखन करताना परीक्षाभिमुख दृष्टिकोन जाणीवपूर्वक जपला आहे.
सदर पुस्तकाचे लेखन करण्यासाठी श्री आचार्यरन देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन व कोल्हा- पुरातील नामवंत ज्येष्ठ विधिज्ञ मा. के. ए. कापसे साहेब, संस्थेचे सचिव मा. मोहन गरगटे साहेब, प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, समन्वयक डॉ. महादेव शिंदे यांनी प्रोत्साहन दिल्याचे डॉ. अन्नदाते नमूद करतात. सदर पुस्तक लेखनासाठी डॉ. अनिरुद्ध क्षीरसागर, अभिजित कार्ले, अमोल गायकवाड, शतानिक राजेभोसले (नोकरी संदर्भ स्पर्धा परीक्षा ग्रंथप्रदर्शन, कोल्हापूर) प्रा. जॉर्ज कुझ (विजयश्री बुक सेंटर, कोल्हापूर) यांनी वेळोवेळी मदत केल्याचे लेखकद्रय नमूद करतात. सदर पुस्तकातील पोलीस शिपाई चालक पदाच्या परीक्षेतील आशय व वस्तुनिष्ठ प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांच्या काही सूचना असल्यास पुढील आवृत्तीत त्यांचा विचार केला जाईल, असे लेखकांनी नमूद केले आहे.
डॉ. शशिकांत अन्नदाते व स्वाती शेटे यांनी साकारलेला हा संदर्भ विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेतील यशासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.
Reviews
There are no reviews yet.