NET/SET/JRF/PET Paper – 1 Sampoorna Margadarshak नेट-सेट पेपर – १ संपूर्ण मार्गदर्शक
लेखक :शशिकांत अन्नदाते
लेखक परिचय
डॉ. शशिकांत श्रीधर अन्नदाते. महावीर महाविद्यालय, कोल्हापूर (स्वायत्त) येथे बीए, बीएड विभागात सहायक प्राध्यापक म्हणून जुलै, २०१० पासून कार्यरत.
डॉ. शशिकांत अन्नदाते यांचे शिक्षण एमए (इतिहास), एमए (मराठी) व एमए (हिंदी), एमएड, नेट-सेट (शिक्षण शास्त्र व इतिहास), पीएचडी (शिक्षणशास्त्र), डीएसएम पर्यंत पूर्ण झाले आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील एमएड परीक्षेत २००७ मध्ये ते विद्यापीठातून सर्वप्रथम आले आहेत.
महाविद्यालयातील इतिहास व शिक्षणशास्त्र अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत.
महावीर स्पर्धा परीक्षा केंद्राचे ते प्रमुख आहेत. त्यांनी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून नेट-सेट परीक्षा, पीएचडी प्रवेश परीक्षा, शिक्षक अभियोग्यता परीक्षा आणि महिला व बालविकास अधिकारी परीक्षेच्या राज्यस्तरीय कार्यशाळांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
महाराष्ट्रातील विविध विद्यापीठे व महाविद्यालयात त्यांनी नेट-सेट, पीएचडी प्रवेश परीक्षा, टीईटी इत्यादी परीक्षांबाबत मार्गदर्शन केले आहे.
त्यांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय परिषदा व चर्चासत्रे यांत १०० हून अधिक ठिकाणी सहभाग घेतला असून त्यांचे ५० शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.
त्यांना अध्यापनाची आवड असून त्यांचे लेखन साध्या-सोप्या भाषेत आहे. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थिप्रिय लेखक म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी पत्नी स्वातीसमवेत स्पर्धा परीक्षांच्या एकूण ४८ पुस्तकांचे लेखन केलेले आहे.
त्यांची संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र (सातवी आवृत्ती), नेट-सेट पेपर पहिला (सातवी आवृत्ती), पुस्तपालन व लेखाकर्म (सातवी आवृत्ती), केंद्रप्रमुख परीक्षा पेपर १ व २, शिक्षक अभियोग्यता परीक्षा संपूर्ण मार्गदर्शक ही पुस्तके शिक्षण क्षेत्रातील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरली आहेत
Available at Ksagar Publications www. ksagar.com or call on 9823118810 / 02024450125
Reviews
There are no reviews yet.