Evolution of Geographical Thought
Evolution of Geographical Thought Original price was: ₹325.00.Current price is: ₹243.75.
Back to products
Madhyayugin Bharat-Mughal Samrajya Khand -2 मध्ययुगीन भारत खंड-२
Madhyayugin Bharat-Mughal Samrajya Khand -2 मध्ययुगीन भारत खंड-२ Original price was: ₹475.00.Current price is: ₹356.25.

Madhyayugin Bharat Khand 1 – Dillichi Sultanshahi मध्ययुगीन भारत-दिल्लीची सुलतानशाही

Original price was: ₹295.00.Current price is: ₹221.25.

Satish Chandra

Madhyayugin Bharat,  Khand 1, Dillichi Sultanshahi, K’Sagar Book

51 in stock

Description

के’ सागरीय

आदरणीय प्रा. सतीश चंद्र इतिहास विषयाचे विद्यार्थिप्रिय प्राध्यापक. त्यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्षपद व नंतर अध्यक्षपदही भूषविले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठासह अलाहाबाद विद्यापीठ, अलिगढ मुस्लीम विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ तद्वतच राजस्थान विद्यापीठातही सरांनी इतिहासाचे अध्यापन केले आहे. केंब्रिज विद्यापीठातही त्यांनी अतिथी प्राध्यापक या नात्याने इतिहास विषयावर व्याख्याने दिली आहेत. भारतीय इतिहास काँग्रेसचेही ते प्रथम सचिव व नंतर अध्यक्ष होते. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांशी ते संबंधित असून केंद्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पुनर्विलोकन समितीचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.

सर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अन् आंतरराष्ट्रीय दर्जाचे इतिहास संशोधक व लेखक आहेत. भारतीय इतिहासाला पूर्वसूरींपेक्षा वेगळे, पण अधिक वास्तव स्वरूप देण्याचे कार्य सरांच्या निष्पक्ष, निर्भीड परंतु तरीही संयमित अशा लेखणीने पार पाडले आहे. ‘मेडिव्हल इंडिया-दिल्ली सल्तनत’ हा त्यांच्या व्यासंगी आणि अभ्यासू लेखणीतून साकारलेला, ओघवत्या इंग्रजीतील विद्यार्थिप्रिय संदर्भ ग्रंथ होय. वाढत्या विद्वत्तेबरोबर अन् वाढत्या व्यासंगाबरोबर माषा बोजड व क्लिष्ट बनत नाही; तर ती अधिकाधिक साधी सोपी व ओघवती बनत जाते, याचे हा ग्रंथ एक उदाहरणच ठरावे.

इतिहासाला न्याय देणाऱ्या, इतिहासातील व्यक्तिमत्त्वांचे त्या काळात जाऊन वास्तववादी चित्रण अन् निष्पक्षपाती मूल्यमापन करणाऱ्या या इंग्रजी संदर्भ ग्रंथाचे मराठी भाषांतर करण्याचे आणि या ग्रंथाला यथायोग्य न्याय देण्याचे कार्य या ग्रंथाच्या दर्जा व गुणवत्तेमुळे खरे तर, अवघड बनलेले ! हे काम माझे मित्र अन् प्रसिद्ध अनुबादक श्री. अनिल काळे यांनी परिश्रमपूर्वक केले आहे. इतिहास विषयातील एक ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. एम. व्ही. काळे यांनी मूळ हस्तलिखित तपासून त्यात काहीही चूक राहणार नाही, याची काळजी घेतली आहे. या सर्व पाश्र्वभूमीवर, संपादन-संस्करणाचे जे अल्प-स्वल्प काम माझ्या वाट्याला आले, ते मी यथामती, यथाशक्ती अन् यथागती पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.

हर-आनंद पब्लिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड, नवी दिल्ली या नामवंत प्रकाशन संस्थेचे डायरेक्टर आदरणीय आशिष गोसाईन यांनी के’ सागर पब्लिकेशन्सप्रती जी आत्मीयता आणि आस्था दाखविली व के’सागर पब्लिकेशन्सला जो सर्वतोपरी सहयोग दिला, त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करणे मी माझे कर्तव्य समजतो.

हर-आनंद पब्लिकेशन्स आणि के’सागर पब्लिकेशन्स यांचा हा सहयोग शिक्षणक्षेत्रात निश्चितच एक आगळीवेगळी क्रांती घडवून आणील, या आत्मविश्वासातून हे पुष्प शैक्षणिक मराठी सारस्वताच्या चरणी अर्पण करीत आहे.

आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
(के’सागर)

मूळ लेखक:सतीश चंद्र
मराठी अनुवाद:अनिल काळे
संस्करण:के’सागर

#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscmarathi #upscmarathi #mpscguidance #upscguidance #mpscmains
#mpscbooklist #upscbooklist #mpscprepration #upscpreparation #mpschistory #upschistory #upschistoryoptional #graduationstudent #indianhistory #universityexam #upsc #mpsc #historysuggestion #mpscupsc #indianhistory #historyofindia

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.

Download

मध्ययुगीन भारत-दिल्लीची सुलतानशाही

Download