Indian Historical Places Dr. Hukumchand Jain
प्रस्तुतचा हा संदर्भग्रंथ म्हणजे जैन सरांच्या ‘इंडियन हिस्टॉरिकल प्लेसेस’ या मूळ इंग्रजी ग्रंथाचा मराठी अनुवाद होय. जैन सरांच्या लेखणीतून उतरलेली संबंधित ऐतिहासिक स्थळांची माहिती अभ्यासताना भारताचा गतकालीन वैभवशाली, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय इतिहास आपल्या डोळ्यांसमोर साकारला जातो. जैन सरांच्या लेखणीचे ते एक वैशिष्ट्यच आहे.
डॉ. एम. व्ही. काळे. माझे ज्येष्ठ व आदरणीय स्नेही. जैन सरांच्या मूळ इंग्रजी ग्रंथाचे मराठी भाषांतर करण्याचे आणि ते करताना मूळ आशयास न्याय देण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी उत्तमरीत्या पार पाडले आहे. त्याबाबतः ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.
आदरणीय जैन सरांनी प्रस्तुत अनुवादाच्या संपादन आणि संस्करणाची जबाबदारी आग्रहाने अस्मादिकांवर सोपविलेली. ही जबाबदारी पार पाडण्याचा यथामती प्रयत्न मी केला आहे.
शेवटी, केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी, इतिहास विषयाचे अभ्यासक प्राध्यापक व अभ्यासू-जिज्ञासू अशा सर्वांनाच हा ग्रंथ उपयुक्त ठरावा, हीच अपेक्षा. या अपेक्षेसह प्रस्तुतचा ग्रंथ आज आपल्या हाती सोपवीत आहे.
आपलाच,
व्ही. एस. क्षीरसागर
History
Reviews
There are no reviews yet.