मित्रांनो,
रेल्वे भरती बोर्ड (RRB) मार्फत कॉन्स्टेबल (RPF) असिस्टंट लोको पायलट (ALP), लिपिक (Clerk), अतांत्रिक संवर्ग (NTPC) या अनुषंगाने ग्रुप ‘सी’ व ग्रुप ‘डी’ अंतर्गत विविध पदांसाठी सातत्याने मोठ्या प्रमाणावर भरती परीक्षा घेण्यात येते.
अलीकडील काळात ही परीक्षा मराठी माध्यमात होत असल्याने हजारो मराठी विद्यार्थीही या परीक्षेला बसतात. तथापि, या परीक्षांसाठी विशेषीकृत मराठी संदर्भ ग्रंथाची उणीव त्यांना मोठ्या प्रमाणावर भासते. महत्त्वाची बाब म्हणजे वरील विविध पदांचे अभ्यास विषय व परीक्षेचे स्वरूप साधारणपणे समान असते.
याचाच विचार करून तथा विद्यार्थ्यांच्या आग्रही मागणीतून सिद्धहस्त विद्यार्थीप्रिय लेखक विनायक घायाळ यांच्या लेखणीतून रेल्वे भरती बोर्डाच्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त असणारे हे पुस्तक साकारले आहे.
या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी, अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी यांच्यावरील प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरणे तथा सविस्तर विश्लेषणे घटकनिहाय स्वरूपात दिलेली आहेत.
स्पष्टीकरणांच्या माध्यमातून आगामी परीक्षेतील प्रश्नांची तयारी व्हावी याकडे विशेष लक्ष देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर बहुतेक प्रश्न हे यापूर्वी ऑनलाइन परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या आधारे समाविष्ट करण्यात आले आहेत.
मराठीतून रेल्वे भरतीसाठी प्रथमच या प्रकारचा अनोखा संदर्भ आपल्या हाती सोपविताना परिपूर्णतेचे एक आगळे वेगळे समाधान मनास लाभत आहे.
विनायक घायाळ सरांच्या इतर पुस्तकांप्रमाणेच हा संदर्भदेखील आपले भविष्य आपला यशोमार्ग सुकर करण्यात मोलाची मदत करील, या सार्थ विश्वासासह तो आपल्या हाती सोपवीत आहे.
आगामी परीक्षेतील यशासाठी आपणास लक्ष-लक्ष शुभेच्छा..!!!
Bhartiya Railway Bharti Pariksha – Ghataknihay Sarav Prashnasanch Available at Ksagar Publications www. ksagar.com or call on 9823118810 / 02024450125
Reviews
There are no reviews yet.