Zilha Madyavarti Banka (DCC Bank) Bharti Pariksha
के’ सागरीय…
राज्यातील बऱ्याचशा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून या वर्षी लेखनिक व तत्सम संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती परीक्षा घेऊन भरली जात आहेत. तुलनात्मकदृष्ट्या ही भरती मोठ्या प्रमाणात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अन्य स्पर्धा परीक्षांशी तुलना करता या परीक्षेचा
अभ्यासक्रम बराचसा वेगळा असल्याने या अभ्यास- क्रमानुसार अनुभवी लेखणीतून साकारलेल्या एका सर्वसमावेशक संदर्भाची नितांत गरज होती. या गरजेतून
प्रेरणा घेऊनच अस्मादिकांनी आपल्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ लेखनानुभवातून प्रस्तुतच्या संदर्भाची रचना साकारली आहे.
विहित केलेल्या अभ्यासक्रमास अनुसरून प्रस्तुतच्या संदर्भात (१) बँकिंग, (२) सहकार व कृषी-ग्रामीण अर्थव्यवस्था (३) संगणक तंत्रज्ञान (४) बुद्धिमापन चाचणी (५) अंकगणित (६) मराठी भाषेचे ज्ञान (७) इंग्रजी भाषेचे ज्ञान व (८) सामान्यज्ञान व चालू घडामोडी या विषयांचा समावेश केला आहे.
विहित अभ्यासक्रमात वर नमूद केलेल्या घटकांची निश्चित व्याप्ती दिली नसली तरी प्रस्तुत लेखकाने
आपल्या प्रदीर्घ लेखनानुभवाच्या आधारे वरील प्रत्येक घटकाची सर्वसाधारण व्याप्ती निश्चित करून प्रत्येक घटकांतर्गत आवश्यक ती प्रकरणे साकारली आहेत. प्रत्येक घटकास योग्य तितके व योग्य तितकेच महत्त्व दिले आहे. प्रस्तुतची भरती जिल्हा मध्यवर्ती बँकांशी निगडित असल्याने प्रस्तुत पुस्तकात महाराष्ट्रातील जिल्ह्यांवर एक
विशेष प्रकरण दिले असून महाराष्ट्रविषयक माहितीवर भर दिला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतील भरतीसाठी
आपला एक ‘आदर्श’ व ‘विश्वासू मित्र’ ठरण्याचे भाग्य या संदर्भास लाभेल आणि आपल्या आगामी परीक्षेत आपणास सुयश मिळवून देण्यासाठी हा संदर्भ आपल्या
विश्वासू मित्राची भूमिका प्रामाणिकपणे व जबाबदारीने पार पाडील, असा सार्थ विश्वास वाटतो.
या सार्थ विश्वासासह आणि शुभेच्छांसह प्रस्तुतचा संदर्भग्रंथ आज आपल्या हाती सोपवीत आहे.
आपला,
व्ही. एस. क्षीरसागर
Reviews
There are no reviews yet.