You must have an order with a minimum of 1 pcs to place your order, your current order total is 0 pcs.

Adhunik Bharatacha Itihas Maharashtrachya Sandarbhat आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या संदर्भात

Original price was: ₹495.00.Current price is: ₹271.01.

K’Sagar

95 in stock

Description

MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर पहिला

आधुनिक भारताचा इतिहास
महाराष्ट्राच्या संदर्भात

लेखन-संस्करण
के’सागर
नवीन अभ्यासक्रमानुसार पाचवी सुधारित आवृत्ती

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या पहिल्या पेपरमधील
इतिहास या घटकाच्या अभ्यासक्रमानुसार रचना केलेला संदर्भ….

के’ सागरीय

प्रा. व्ही. बी. पाटील. राज्यशास्त्राचे तद्वतच इतिहास आणि समाजशास्त्राचेही व्यासंगी अभ्यासक आणि अध्यापक. व्यक्तीशः माझे ज्येष्ठ स्नेही व के’सागर परिवाराचे एक सुहृद. प्रकाशनाची अनेक पुस्तके त्यांच्या अभ्यासू लेखणीतून स्वतंत्रपणे तद्वतच अस्मादिकांबरोबर संयुक्तपणे साकारलेली. ‘महाराष्ट्राचा सर्वांगीण इतिहास’ व ‘विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारणेचा इतिहास’ ही त्यांची पुस्तके विद्यार्थिप्रिय ठरलेली.

डॉ. व्ही. टी. देशपांडे माझे ज्येष्ठ स्नेही व सृहृद. प्रकाशनासाठी त्यांनी लिहिलेला ‘आधुनिक भारताचा इतिहास’ हा संदर्भ ग्रंथ आधुनिक भारताच्या इतिहासाचा विस्तृत व विश्लेषक परामर्श घेणारा.

डॉ. हुकमचंद जैन. एक व्यासंगी व अभ्यासू व्यक्तिमत्त्व. विनम्र आणि पारदर्शी. आधुनिक जगाच्या इतिहासावरील त्यांचा इंग्रजी ग्रंथ राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थिप्रिय ठरलेला. आधुनिक भारताच्या इतिहासावरील त्यांचे पुस्तक केंद्र लोकसेवा आयोगाच्या विद्यार्थ्यांना जितकं भावलेलं तितकंच त्यांच्यासाठी उपयुक्तही सिद्ध झालेलं.

अस्मादिकांचं आधुनिक भारताचा इतिहास, महाराष्ट्रातील समाजसुधारक व अस्सा हा महाराष्ट्र आणि इतर अनेक संदर्भ महाराष्ट्रीय तरुणांना भावलेले आणि आयोगाच्या परीक्षांकरिता उपयुक्त ठरलेले. तीच अस्मादिकांची जीवन प्रवासातील शिदोरी !

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या नव्या अभ्यासक्रमानुसार पूर्वीच्या प्रत्येकी दोनशे गुणांच्या सामान्य अध्ययनाच्या दोन पेपर्सऐवजी प्रत्येकी १५० गुण असलेल्या सामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सचा सामना आता आपणास करावयाचा आहे.

प्रस्तुतचा संदर्भ सामान्य अध्ययनाच्या पहिल्या पेपरमधील इतिहास या घटकाच्या अभ्यासक्रमावर आधारलेला. ‘आधुनिक भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या संदर्भात)’ या यथार्थ नावाने साकारलेला.
अभ्यासक्रमानुसार आणि अभ्यासक्रमानुसारच रचना केलेला. अभ्यासक्रमास परिपूर्ण न्याय देणारा.

आपल्या परीक्षेचा अभ्यास उत्तम प्रकारे होऊन विद्यार्थ्यांना राज्यसेवा मुख्य परीक्षेत भरपूर गुण मिळावेत व ते मुलाखत आणि व्यक्तिमत्त्व चाचणीसाठी पात्र ठरावेत, हा प्रस्तुतच्या पुस्तकाच्या रचनेमागील उद्देश. यास्तव अस्मादिकांनी लिहिलेले उपरोक्त तिनही संदर्भ, अस्मादिकांनीच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून रचना केलेले वस्तुनिष्ठ प्रश्न आणि उपरोक्त लेखक त्रयींच्या उपरिनिर्दिष्टीत ग्रंथांमधून अस्मादिकांनी संस्करित व संपादित केलेला अभ्यासक्रमांतर्गत येणारा मजकूर, डॉ. बिपन चंद्र सरांच्या इंडियाज् स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स व मॉडर्न इंडिया या ग्रंथांच्या के’सागरीय मराठी अनुवादांचा घेतलेला मुक्त संदर्भ यांतून हा ग्रंथ आकारबद्ध झालेला. स्वाभाविकच या ग्रंथाच्या साकारण्यातील या सर्वांचंच ऋण अस्मादिकांनी मोलाचं मानलेलं.

राज्यसेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाच्या पहिल्या पेपरमधील इतिहास घटकाच्या तयारीसाठी अभ्यासक्रमानुसार रचना केलेला दर्जेदार व उपयुक्त ग्रंथ सिद्ध व्हावा, यासाठीच खरे तर हा सारा अट्टाहास.

शुभेच्छांसह !
आपलाच,
व्ही.एस.क्षीरसागर
(K’Sagar)

#ksagarpublication #ksagar #comptativeexam #केसागरपब्लिकेशन #अनिरुद्धपब्लिशिंगहाऊस #ksagarcareeracademy #upsc #mpsc #mpsckatta #postgraduation #rajyasevamains #rajyasevapre #rajyaseva2025 #mpscguidance #upscguidance #mpscmains #mpscbooklist #upscbooklist #mpschistory #mpschistorymcqs #maharashtrahistory #upschistory #upschistoryoptional #indianhistory #graduationstudent #translated #paper1 #comptativeexam #competative_exam #mpscupsc

Reviews (0)

Reviews

There are no reviews yet.

Only logged in customers who have purchased this product may leave a review.